location tracker app: फक्त मोबाईल नंबरच्या सहाय्याने सहज कोणाचंही लाईव्ह लोकेशन पाहा, ते सुद्धा अगदी मोफत!

location tracker app: आजच्या टेक्नॉलॉजी युगात मोबाईल हा सगळ्यांच्याच जीवनाचा एक अविभाज्य भाग होऊन बसला आहे. पण त्या मोबाईलमधूनच आपण एखाद्याचे लोकेशन शोधू शकतो, तेही एकाही रुपया खर्च न करता, हे खरे वाटत नाही ना? अनेकजण गुगल प्ले स्टोअरवर location tracker app शोधत असतात, पण बहुतांश वेळा ते ॲप्स पेड असतात. कधी 1000 रुपये, तर कधी 3000 रुपये महिन्याकाठी आकारलं जातं. मग त्याचा वापर झाला नाही तर पैसे सुद्धा असेच वाया जातात!

या सगळ्या भानगडीत न पडता, आम्ही तुम्हाला एक अतिशय सोपी आणि विश्वासार्ह पद्धत सांगणार आहोत, जी की एकदम फ्री आहे, आणि तुम्हाला कोणत्याही व्यक्तीचं लाईव्ह लोकेशन सहजपणे ट्रॅक करून देते.

पैसे खाऊ लोकेशन ट्रॅकर ॲप्सपासून सावध रहा!

प्ले स्टोअरवर सर्च केल्यावर मोबाईल नंबरवरून लोकेशन दाखवणारी अनेक ऍप्स सापडतील. पण त्यातील ९०% ॲप्स तुम्हाला यासाठी पैसे मागतात. अनेकदा एकदा पैसे भरले की नंतर ॲपचा वापर होत नसल्याने ते वाया जातात. म्हणूनच, अशा ॲप्सपासून थोडं सावध रहा!

मोफत  लोकेशन ट्रॅक करण्यासाठी वापरा Google Map

जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचं लाईव्ह लोकेशन मिळवायचं असेल आणि ती व्यक्ती तुमच्या ओळखीची असेल, तर हे मोफत आणि कायदेशीर मार्गाने सहज शक्य आहे.

कसे कराल?

  • त्या व्यक्तीच्या मोबाईलमधील Google Map हे ॲप ओपन करा.
  • वरच्या उजव्या बाजूला असलेल्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
  • तिथे तुम्हाला Location Sharing हा पर्याय दिसेल.
  • त्यामध्ये Share location हा पर्याय निवडा.
  • आता तिथे तुमचा मोबाईल नंबर टाका किंवा तुमचं Gmail account निवडा.
  • त्या व्यक्तीने लोकेशन शेअर करताच, ती जिथे जाईल, तिथलं लोकेशन तुम्हाला तुमच्या Google Map वर सतत दिसत राहील.

या पद्धतीचा उपयोग कोण कोण करू शकतो?

तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेला तर दुसऱ्या कोणाच्या मोबाईलमधून हे लोकेशन ट्रॅक करता येते. तुमचं लोकेशन जर तुम्ही आधीच कोणाच्या तरी मोबाईलवर शेअर केलेलं असेल, तर त्या व्यक्तीला अगदी व्यवस्थित दाखवलं जाईल की तुमचा फोन सध्या कुठे फिरत आहे. त्यामुळे चोरीस गेलेला फोनही यामुळे सहज मिळवता येऊ शकतो.

कधी कधी आपल्याला वाटतं की समोरची व्यक्ती खोटं बोलतेय… उगाच कारणे देतेय. तर अशा वेळी जर तुम्ही तिच्या मोबाईलवरून तुमचं लोकेशन शेअर करून घेतलं असेल, तर ती व्यक्ती खरंच कुठे आहे हे तुम्हाला समजेल आणि तुमच्याजवळ त्यावर आधारित ठोस पुरावे असतील.

तसेच आजची तरुण पिढी रात्री उशिरापर्यंत बाहेर असते, पार्टी, क्लब, लॉन्ग ड्राईव्ह, अशा वेळी पालकांच्या मनात चिंता असणं स्वाभाविक आहे. पालकांनी मुलांच्या मोबाईल मधून आपल्या नंबरवर Google Map च्या सहाय्याने लोकेशन शेअर करून ठेवावं.

एक गोष्ट लक्षात ठेवा…

ही पद्धत त्याच वेळी शक्य आहे, जेव्हा संबंधित व्यक्ती तुमच्यासोबत लोकेशन शेअर करायला तयार आहे. म्हणजेच, हे समोरच्याच्या परवानगी शिवाय शक्य नाही. त्यामुळे या सुविधेचा दुरुपयोग करू नये. तिचा उपयोग योग्य कारणांसाठीच करावा, अन्यथा कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात.

Sharing Is Caring:

Leave a Comment